डाएट आणि व्यायामाने वजन कमी होतं सत्य की गैरसमज?

वेटलाॅस चं भूत हे खरं भूत च कारण ते दर दोन तीन महिन्यांनी वजन वाढलेलं दिसलं की बाहेर येतं… मग काही दिवस सकाळी उठून गरमपाणी, कमी जेवण, वाॅकिंग, हे सगळे प्रकार चालु होतात. पुढे दहाबारा दिवस हे भूत एवढं अॅक्टिव असतं कि वाटतं बास आता पाच दहा किलो कमी झालेच. पण काही दिवसांनी वाॅकिंग करताना कुणीतरी भेटतं… आणि काहितरी वेगळच करा वेटलाॅस साठी हे सांगत तसही भारतात तर सल्लागारांची काही कमतरताच नाहीये.. ते आपल्याला पावला पावलावर भेटतात….

एवढा त्रास घ्यायला काही फार नाहीये तुमंच वजन…

तुला तुझ वजन सुट होतं..

माणसानं कस हेल्दी असावं

थोडं सुख/लग्न मानवलेलं दिसल पाहिजे पोटावर

अरे पतला रहने से ज्यादी इंपाॅरटंट फिट रहना है..

चाळीशीच्या वर गेलं ना कि वजन कमी होतच नाही…

असे प्रेमळ सल्ले वजन कमी करायला सुरूवात केल्यापासुनच चालु होतात….

.. अस हे वेटलाॅस मिशन आपलं लाईफ टाईम चालू.. होईल तेव्हा होईल…. तो पर्यंत आपलं चालुच….. एक्सेल साईज दिखाओ भैया…! आणि कम बटर डालो भैया..! अस म्हणत स्वतःला फसवत राहायचं

एखादी बारीक कुणी दिसलं कि पुन्हा आपलं चालु लिंबु पा़णी, गरम पाणी, ओट्स, आणि फळं…. करायचं दोनचार दिवस मग भेटतोच एखादा सल्लागार…. मग पुन्हा येरे माझ्या मागल्या चालु….. सुरू होते चर्चेचं गुर्हाळ.

तू काय करतेस आणि तो काय करतो? मग जे ते करतात तेच मी पण करीन.
मुळात सगळ्यांची वजन सारखी नसतात आणि सगळ्यांची प्रकृतीपण सारखी नसते. तसच वजन कमी करण्यासाठी एकच पध्दत सगळ्यासाठी तितकी उपयोगी पडेलच असं नाही.
काही मूलभूत मुद्दे इथे लक्षात घ्यायला हवेत.
१. जास्तीचं वजन किती आहे?

अ. 5 ते 10 किलो
ब.15 ते 20 किलो
ब. 20 किलोपेक्षा जास्त

उत्तर सोपं आहे, जसं ५ ते 10 किलोमीटर अंतर जाण्यासाठी चालत,दुचाकी,असे विविध पर्याय तर 20 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर जायच असेल तर पर्याय वेगळे असतात तसंच वजनाच आहे; पण हेच पर्याय कमी वेळात जास्त अंतर कापण्यासाठी कुचकामी ठरतात.

काळ काम वेग आपण सगळे गणितात शिकलो आहोत. त्याच नियमाने खूप वजन कमी करण्यासाठी खूप काळ आणि खूप काम करायला हवे अर्थात मग सातत्य अतिशय महत्त्वाचे. नाहीतर नवीन तंत्रज्ञान आपला वेळ कष्ट वाचवू शकते. आता सांगा जास्त अंतर कापण्यासाठी जर आपण चालत जात नाही तर खूप जास्त वजन कमी करायचे असेल किंवा डाएट आणि व्यायाम करूनही जर वजन जागचे तसूभरही हलत नसेल तर फक्त डाएट आणि व्यायाम किती दिवस करणार? आणि त्याने असे किती वजन कमी होणार? नेमकी इथेच वजन कमी करण्यासाठीची शस्त्रक्रिया परिणामकारक ठरते. एकदा वजन कमी झाले की डाएट आणि व्यायाम सातत्याने करणे आणि निरोगी राहणे सोपे होते, शिवाय वजन कमी झाल्याने वाढलेल्या वजनामुळे आलेले डायबेटीस, बीपी,सांधेदुखी, घोरणे, असे आजारही निघून जातात.
म्हणून जर तुम्हाला कोणी खुप वजन किंवा वजन आणि डायबेटीस, बीपी,सांधेदुखी, घोरणे, असे त्रास असणारे माहीत असतील तर त्यांना डाएट आणि व्यायामाचा नाही तर वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेविषयी सल्ला द्या ते तुम्हाला आयुष्यभर दुवा देतील.